आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ‘गोळवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमध्ये SC, ST यांची आरक्षणे रद्द केली पाहिजे अशी संकल्पना आहे. सरकारने स्पष्ट केले पाहिजे की त्याची सुरुवात या देशात या सरकारच्या माध्यमातून सुरु झाली आहे का ? भविष्यकाळामध्ये SC, ST चे आरक्षण रद्द करणार आहे का? याचा आधी खुलासा सरकारने केला पाहिजे. गरीबाला आरक्षण मिळत असेल तर आमचा विरोध नाही परंतु निर्णय घेत असताना सरकारने जी ८ लाख रुपयांची उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे. म्हणजे गरीबांसाठी हे आरक्षण आहे की, खात्यापित्या लोकांसाठी आहे. हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे’ अशी मागणी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आज केंद्रीय कॅबिनेटने अप्पर कास्टमध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आर्थिक निकषावर देशामध्ये आरक्षण निती लागू केली पाहिजे असे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा