राज्यात पोलीस बदल्यांच्या याद्या अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या माध्यमातून येत असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे अनिल देशमुख यांनी देखील अनिल परब यांचं नाव घेतलेलं असताना आता या सगळ्या प्रकरणावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचं सांगतानाच राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं नमूद केलं आहे.

“परमबीर सिंग यांची सगळी वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे. हा सर्व विषय अँटिलिया बॉम्ब प्लांट प्रकरणापासून सुरू झाला. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएसच्या तपासात अजून काही सत्य समोर येणार होतं. पण एनआयएनं हा तपास हाती घेतल्यानंतर परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा देखील उल्लेख आहे. इमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले त्याचाही उल्लेख आहे. एनआयएने सांगितलं होतं की आम्ही या प्रकरणात अतिरिक्त चार्जशीट फाईल करणार. पण ते होत नाहीये”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”

पोलीस बदल्यांबाबत परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “यावर आमचा खुलासा…”

परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न?

दरम्यान, हा सगळा परमबीर सिंग यांनाच वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. “परमबीर सिंग यांना एनआयएच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परमबीर सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप केले गेले. परमबीर सिंग हेच मास्टरमाईंड असून त्यांची वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे कारस्थान रचलं आहे. कोर्टात हे सगळं उघडं पडेल”, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला.

पोलीस बदल्यांच्या प्रकरणात परमबीर सिंग यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबात अनिल देशमुख आणि अनिल परब यांची नावं घेतली आहेत. “राज्यात पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी गृहविभागाकडून एक समिती नेमण्यात येते. या समितीमध्ये परमबीर सिंग देखील होते. या विभागाकडे बदल्यांसंदर्भातील याद्या दिल्या जातात. या याद्या गृह मंत्रालयाकडून येत होत्या. पण त्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून देखील येत होत्या”, असं परमबीर सिंग यांनी ईडीला सांगितलं आहे.

Story img Loader