Nawab Malik Son in Law Sameer Khan Health Condition : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातानंतर समीर खान यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार येत होते. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या. याप्रकरणी नवाब मलिक यांनी आता स्पष्टीकरण दिलं असून खोट्या वृत्तांना पूर्णविराम दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवाब मलिक यांचा जावई समीर खान हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, १२ ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरू लागल्या. त्यांचं निधन झाल्याची बातमी समाज माध्यमांमध्ये पसरली. अखेर नवाब मलिक यांनीच स्वतःहून याविषयी एक्सवरून माहिती दिली आहे. “

माझ्या जावयाच्या प्रकृतीबद्दल काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की काल त्यांची प्रकृती गंभीर असताना त्यांच्यात आता सुधारणा जाणवायला लागली आहे. कृपया अफवा पसरवणे टाळा आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद”, असं नवाब मलिक म्हणाले.

कारचा अपघात नेमका कसा झाला?

समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघे १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले होते. यानंतर समीर खान यांनी चालकाला थार कार घेऊन येण्यास सांगितलं, यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटरवर पाय पडला आणि थार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा समीर खान आयसीयूमध्ये दाखल होते. तर निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली होतं. समीर खान यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं गेलं आहे.

हेही वाचा >> Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात

अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत

कुर्ला भागात जो अपघात झाला त्यात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसंच त्यांच्या चेहऱ्यालाही इजा झाली. कार चालकाने गाडीचा अॅक्सिलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली त्यांना कारने फरफटत नेलं. एचडीआयएल वसाहतीच्या भिंतीवर आदळली. या प्रकरणात कार चालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे काही दुचाकीही चिरडल्या गेल्या आहेत. विनोबा भावे पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik son in law sameer khan is fine do not spread rumours sgk