Nawab Malik : ‘नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही’ असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना लिहिले होते. तेव्हापासून मलिक यांना राष्ट्रवादीने दूरच ठेवले आहे. यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगर या मलिक यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना उमेदवारी देणार का? मलिक अपक्ष लढणार की निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणार, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु नवाब मलिक यांनी आता स्वातंत्र्यदिनानिमित्ताने केलेल्या पोस्टमध्ये घड्याळ चिन्ह दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अंडरवर्ल्ड क्षेत्रातील लोकांशी व्यवहार केल्याने नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता. राष्ट्रवादीतील बंडानंतर नवाब मलिक यांनी उघडपणे भू्मिका घेण्याचे टाळले होते. पण सुटकेच्या आशेने त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने होता. अजित पवारांनी शब्द टाकल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. कारण आधी वैद्यकीय कारणावरून जामिनाला विरोध करणाऱ्या ’ईडी’चा विरोध नंतर मावळला होता.
हेही वाचा >> कारण राजकारण: अणुशक्ती’मध्ये मलिकांमागे कुणाची शक्ती?
नवाब मलिकांना महायुतीत नो एन्ट्री
जामिनानंतर सहा महिने मलिक प्रसिद्धीपासून दूरच होते. गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले. मलिक सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या बाकांवर बसले. ही बाब भाजपला रुचली नाही. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांना पत्र पाठविले. त्यात ‘नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत हे पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मलिक यांना महायुतीची दारे बंद झाली आहेत. यामुळेच बहुधा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलिक यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली होती.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 15, 2024
Happy Independence Day!#IndependenceDay #Independence pic.twitter.com/A4fg1irMVG
हेही वाचा >> Nawab Malik : नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा, उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम!
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रवाहातील राजकारणापासून लांब राहिलेल्या नवाब मलिक यांनी त्यांच्या शुभेच्छा पत्रावर राष्ट्रवादीचं अधिकृत पक्षचिन्ह असलेल्या घड्याळ चिन्हाचा वापर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते अजित पवार गटात जातायत की काय या चर्चेला आता जोर येऊ लागला आहे.
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली.