जिल्ह्य़ात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी पहाटे अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे (५०) याची गोळ्या घालून हत्या केल्याने सर्वत्र दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-गुंडेरा मार्गावर ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर व भिंतीपत्रक लावून या निवडणुकीवर बहिष्कार घाला अन्यथा ठार करू, अशा धमक्याही यातून देण्यात आल्या आहेत.