* एक पोलिस अधिकारी शहीद
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांना चार लक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर, यात एक पोलिस अधिकारी शहीद झाल्याचे समजते. तसेच तीन सामान्य नागरिकांचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे. गावात सभा सुरु असताना नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे परिसरात धांदल उडाली व यात तीन सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला.
नुकताच, गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुक्यात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले होते. भामरागडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या भटपर व कवंढे गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक उडाली होती. या कारवाईत पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला होता.

Story img Loader