गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दुपारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे एका पोलीस पाटलाची गळा चिरून हत्या केली. नक्षलवाद्यांनी या वर्षांत या जिल्ह्य़ात केलेली ही बाविसावी हत्या आहे.
या तालुक्यातील व्यंकटापूरचे पोलीस पाटील आत्माराम सडवेल्ली यांचे दोन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. दहशतीमुळे या अपहरणाची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली नव्हती. दोन दिवस ताब्यात ठेवल्यानंतर नक्षलवाद्यांनी आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांना आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर असलेल्या बामणी गावाजवळ आणले. रस्त्यावरच त्यांचा कुऱ्हाडीने गळा कापण्यात आला.
 नक्षलवाद्यांनी त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून ठेवला. या रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी या घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना दिली. ४८ वर्षांचे आत्माराम सडवेल्ली गेल्या अनेक वर्षांंपासून पोलीस पाटील होते.
नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरे समजून त्यांची हत्या केली असावी, असा संशय घेतला जात आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा