राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी कोठी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे गुरुवारी रात्री अपहरण केले. बंडू वाचामी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी त्याला ठार मारल्याचा संशय आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.
वाचामी हे कोठी पोलीस ठाण्यात तैनात आहेत. गुरुवारी रात्री गुंडूरवाही येथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. याबद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यावर तातडीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. पण नक्षल्यांनी त्यांना ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Story img Loader