पाच दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या कोठी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बंडू वाचामी यांची नक्षलवाद्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बदमाश पोलिसांची अशाच पध्दतीने हत्या केली जाईल, या आशयाची पत्रके नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ टाकली आहेत. शहीद जवान बंडू वाचामी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडाचे रहिवासी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलीस शिपाई बंडू वाचामी १० मे पासून बेपत्ता होते. दरम्यानच्या काळात राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. याच पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी बंडू वाचामी यांचे अपहरण केल्याची चर्चा होती. त्यांच्या शोधार्थ गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून तीव्र शोध मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. हा शोध सुरू असतांनाच सोमवारी सकाळी भामरागडपासून ६ किलोमीटरवरील आरेवाडा येथे बांबू डेपोजवळ बंडू यांचा मृतदेह सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. त्यांच्या डोक्यात नक्षलवाद्यांनी गोळ्या घातल्या. घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात पत्रके टाकली. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची बदमाशी केली किंवा बदमाश पोलिसांची अशाच प्रकारे हत्या केली जाईल, असा थेट इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांनी बंडू यांचे अपहरण केल्याचे व त्यांच्या हत्येची शंका व्यक्त करणारे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. मात्र, गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मात्र अपहरण झाल्याचे मान्य करायला तयार नव्हते. भामरागड एलओएस नक्षलवादी दलमने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. गुन्ह्य़ात सहभागी असल्याच्या संशयावरून सोमवारी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.