NCP Ajit pawar Jan Sanman Melava Baramati : लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अंगणातूनच शक्तीप्रदर्शनाची सुरुवात केली असून आज बारामती येथे राज्यव्यापी जन सन्मान मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना भरली. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, लोकसभेचे एकमेव खासदार सुनील तटकरे, विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटापेक्षा अधिक यश मिळविण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे यानिमित्ताने सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाने २०० कोटी देऊन प्रचारासाठी एजन्सी नेमली असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी सर्व आमदारांसह मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर आता त्यांनी शरद पवार गटाच्या आधीच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर महायुतीला निवडा
मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला १५०० रुपयांचा लाभ मिळत राहावा, असे वाटत असेल तर पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून द्या. “राज्यातील महिला सक्षम व्हायला हवी, असे मला आणि आमच्या महायुतीच्या सरकारला वाटते. राज्यातील महिला आत्मनिर्भर व्हायला हव्यात, सरकारवर लोकांचा विश्वास असायला हवा. ‘मला माझ्या घरातील पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही, मला दरवर्षी राज्य सरकारकडून १८ हजार रुपये मिळत आहेत’, या गोष्टीचं राज्यातील महिलांना समाधान वाटायला हवं. मी सर्वांना हेच सांगतो की आपल्या सरकारचं हे सातत्य आपण टिकवायला हवे आणि ते टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा महायुतीचा विचार करावा लागेल. राज्यातील जनतेला ठरवावं लागेल की यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीला निवडून द्यायचे आहे”, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
हे वाचा >> नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
विधानपरिषदेच्या विजयाने हुरळून जाणार नाही
नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने ११ पैकी ९ जागांवर विजय मिळविला. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाला. या विजयाने आपण हुरळून जाणार नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी ताकदीने विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे थेट नाव घेणे टाळले. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे ते शरद पवार गटावर टीका करत होते, त्यात आता सुधारणा करून त्यांनी एकदाही शरद पवार गटावर टीका केली नाही.
बारामतीमधून फोन गेला आणि…
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे थेट नाव घेऊन टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
“मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधक येणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली. शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली होती. त्यासाठी महाराष्ट्र त्यांना कायम स्मरणात ठेवेल. पण आज महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न उग्र बनला असताना तुम्ही मागे का? तुम्ही सर्वांना घेऊन खरंतर पुढे यायला हवे होते. अशावेळी तुम्ही हा प्रश्न आणखी चिघळविण्याचा प्रयत्न का करत आहात?”, असा थेट प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित करत जोरदार टीका केली.