Hasan Mushrif On Samarjeet Ghatge : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा देखील सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच अनेक नेते विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरमध्ये धक्का बसला. समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे आता कागलमध्ये समरजितसिंह घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Maharashtra Breaking News Live : “अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा मुख्य आरोपीला…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“कागलमध्ये ईडीचे प्रकरण कोणामुळे झाले याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यायला हवी होती. खरं तर सुप्रिया सुळे यांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळायला हवं होतं”, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता समरजिसिंह घाटगे यांच्यावर टीका केली. दरम्यान, हसन मुश्रीफ यांचा रविवारी मुंबईमध्ये कागल गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठीचा मेळावा पार पडला. दुसरीकडे समरजिसिंह घाटगे यांनी देखील पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला होता. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी समरजिसिंह घाटगे यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group leader hasan mushrif on samarjeet ghatge in kolhapur politics rno gkt