Jay Pawar On Baramati Assembly Constituency : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच सभा, मेळावे आणि बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. याच बरोबर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. यातच कोण कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवणार? याबाबतची चाचपणीही सुरु आहे.

असं असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो’, असं मोठं विधान केलं होतं. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जय पवार निवडणूक लढणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर याबाबत आता जय पवार यांनी सूचक भाष्य केलं आहे. बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं. “उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसं”, असं जय पवार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”

हेही वाचा : Eknath Khadse : “…अन्यथा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार”, एकनाथ खडसेंचं मोठं विधान

जय पवार काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा बारामतीत होती. यावेळी जय पवार यांच्या नेतृत्वात बारामतीत मोठी रॅली काढण्यात आली. या अनुषंगाने बोलताना जय पवार म्हणाले की, “जनसन्मान रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज या कार्यक्रमासाठी पक्षाचे सर्वच नेते उपस्थित आहेत.”

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला निवडणूक लढवण्याबाबत रस नसल्याचं एक विधान केलं होतं. त्या विधानाबाबत विचारलं असता जय पवार यांनी म्हटलं की, “सर्व तरुणांचा पुढाकार आहे. मात्र, अजित पवार काय निर्णय घेतील ते बघूयात. माझी इच्छा ही अधिपासूनच सर्वांना मदत करण्याची आहे. अजित पवारांनी मतदारसंघात ज्या प्रकारे काम केलं आहे. त्या प्रकारे लोकांचे कामं करायची आहेत”, असं जय पवार म्हणाले.

विधानसभेसाठी इच्छुक आहात का?

आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता जय पवारांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसं.”

अजित पवार काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले होते की, “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”

Story img Loader