Manikrao Kokate On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना संधी न देण्यात आल्यामुळे भुजबळ पक्षावर नाराज आहेत. यासंदर्भात भुजबळांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही नाराजी बोलून दाखवत खोचक टीका केली. त्यानंतर जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं होतं. तसेच आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचक विधान केलं आहे. “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, असं मोठं भाष्य कोकाटे यांनी केलं. एवढंच नाही तर छगन भुजबळांचे पक्षाने खूप लाड केले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana
Manikrao Kokate : “कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, लाडकी बहीण योजनेबाबत कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं विधान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : “पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं; आम्हाला..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar : “माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला…”; सुधीर मुनगंटीवार यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे का? त्यांना दिल्लीत पाठवायचं होतं का? पक्षात अशी काही चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “छगन भुजबळ कधी नाराज होते? तुम्हाला कोणी सांगितलं ते नाराज आहेत? ते नाराज आहेत असं मला वाटत नाही. जो जे वांछील तो ते लाहो. ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतील. त्यांना केंद्रात जायचं तर ते जाऊ शकतील. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे आहेत. माझे नेते दुसरे कोणीही नाही” असं सूचक विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं.

हेही वाचा : “कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, लाडकी बहीण योजनेबाबत कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं विधान

भुजबळांच्या मागणीकडे पक्ष दुर्लक्ष करत आहे का?

छगन भुजबळ यांच्या मागणीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुर्लक्ष करत आहे का? असं विचारलं असता माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “असं काहीही नाही. पक्षाने त्यांचे (छगन भुजबळ यांचे) पुष्कळ लाड केले. आता काय लाड करायचे राहिलेत?”, असं म्हणत कोकाटे यांनी छगन भुजबळांवर खोचक टीका केली. तसेच भुजबळ भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, यासंदर्भात विचारलं असता माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “आता तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना जो वाटतो तो निर्णय ते घेऊ शकतात.”

पालकमंत्री पदाचं वाटप कधी होईल?

महायुतीचं सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, अद्याप पालकमंत्री पदाबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “पालकमंत्री पदाचं वाटप कधी होईल? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. पालकमंत्री पदावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. तसेच बीडच्या पालकमंत्री पदाबाबत देखील मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.

Story img Loader