भाजपा आणि आमच्या वैचारीक लढाई आहे. या लढाईत प्रफुल पटेल भाजपाच्या बाजूने आहेत त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. मात्र श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखं काहीही केलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. ज्यानंतर सुनील तटकरेंसह अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर तुफान टीका सुरु झाली. सुप्रिया सुळे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही एक कविता पोस्ट करुन सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

काय आहे रुपाली चाकणकर यांनी पोस्ट केलेली कविता?

तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”

दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?

चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?

तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?

पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?

नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?

घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?

प.पा.

अशी कविता पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. अजित पवार गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली होती. याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले होते?

“अजित पवारांनी ३० वर्षे बारामती शहर उभे केले. दादा… दादा… दादा म्हणत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

Story img Loader