विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप किंवा दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, यावेळी सत्ताधाऱ्यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना दिलेल्या मदतनिधीच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक शब्दांत टोला लगावला.

नेमकं झालं काय?

राज्य सरकारकडून पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या निधीमध्ये भाजपाच्या आमदारांच्या मतदारसंघात जास्त निधी जाहीर झाला असून शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी कमी मदतनिधी जाहीर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, असं असताना आधीच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच, देण्यात येणाऱ्या निधीबाबत देखील अजित पवारांनी खोचक टीका केली.

Amol Mitkari ajit pawar naresh arora news
नरेश अरोराचा अजित पवारांच्या खांद्यावर हात; मिटकरी थेट पक्षाशी भिडले, महायुतीपाठोपाठ राष्ट्रवादीतही गोंधळ
History of Chief Ministers of Maharashtra and Their Service Period in Marathi
CM of Maharashtra and Their Tenure: महाराष्ट्राला आत्तापर्यंत…
EX MLA Allegation on EVM
Harshwardhan Jadhav : “विधानसभा निवडणुकीचा निकाल ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त…”, माजी आमदाराचा गंभीर आरोप
Rohit Pawar
Rohit Pawar : विजयी उमेदवारांना जवळपास सारखीचं मते; आकडेवारी दाखवत रोहित पवार म्हणाले, “गुजराती EVMच्या विळख्यात…”
Jitendra Awhad on EVM
Jitendra Awhad on EVM: “मतदान झालं ३१२, मतमोजणीत निघाले ६२४”, जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी
Eknath Shinde C. P. Radhakrishnan devendra fadnavis ajit pawar deepak kesarkar
भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
EKnath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
Muslim voters in Maharashtra
Muslim Voting: मुस्लीम मतदारांचा महायुतीला लाभ; मुस्लीमबहुल मतदारसंघात मविआची पीछेहाट का झाली?

“दुजाभाव करू नका”

सरकारने निधीवाटपामध्ये दुजाभाव करू नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. “मुख्यमंत्री महोदय, आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्या ४० आमदारांना ५० कोटींची कामं दिली आहेत. शिंदे गट, तुमचा गट, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. भाजपानं देखील आपल्या आमदारांसाठी ५०-५० कोटींची कामं घेतली. पण असा दुजाभाव करू नका. कारण जिथं नुकसान व्हायचं तिथे ते झालंच आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मतदारसंघ बघून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा मतदारसंघ असं काही नुकसान झालेलं नाही. सगळीकडेच नुकसान झालं आहे. त्यामुळे मदतनिधी देताना थोडं खुलं धोरण ठेवावं लागेल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा

अजित पवारांचं सूचक विधान!

दरम्यान, अजित पवारांनी मिश्किल शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावताना सूचक विधान केलं आहे. “आपण मंत्रीमंडळात एकत्र असताना जी कामं आपण केली, त्याला तुम्ही आता स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका”, असं अजित पवार म्हणाले.