राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन विरोधकांना टोला लगावला असून कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? अशी विचारणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

आणखी वाचा- “…वाजवा किती वाजवायचं ते,” अजित पवारांचा विरोधकांना टोला

प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नसल्याच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता”.

आणखी वाचा- धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन :-
पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो”.

“मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on bjp over dhananjay munde allegations svk 88 sgy