सुशीलकुमार शिंदे यांचे भाकीत
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज भिन्न असले तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष लवकरच एकमेकात मिसळतील, त्यांचे विलीनीकरण होईल, असे भाकीत काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केले. शरद पवार आणि आपण अनेक सुख-दु:खात एकत्र असतो, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर शिंदे यांनी संपूर्ण सोलापूर मतदारसंघातील संपर्क वाढवून प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कृतज्ञता मेळावे, स्नेहमेळावे, सभा-संमेलनांचा शिंदे यांनी सपाटा लावला आहे. या सर्व कार्यक्रमांपैकी एकाही ठिकाणी शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहण्याचे व्रत सोडले नाही. शरद पवार यांच्यासोबतचा मैत्रीचा धागा अधिक मजबूत करीत, शिंदे यांनी आता काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये ऐक्य घडण्याचे संकेत दिल़े त्याचवेळी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी हेच असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
शिंदे यांनी यापूर्वी अनेकवेळा शरदनिष्ठा जाहीर केली होती. आपले राजकीय गुरू शरद पवार हेच असून आज आपण जे काही आहोत, ते केवळ शरद पवारांमुळे, आपल्यात जे काही चांगले ते शरद पवारांचे आणि जे वाईट आहे, ते आपले स्वत:चे असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केली आहे. मागील २०१२ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीच्यावेळी पवार यांच्याबरोबर आपले काहीसे बिघडले होते. त्यामागे कोणी तरी त्यांचा गैरसमज करून दिला होता, हेदेखील सांगायला शिंदे विसरत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात शिंदे हेच काँग्रेसचे उमेदवार असल्याचे उघड गुपित असून त्या अनषंगाने त्यांचे संपर्क दौरे वाढले आहेत. त्यामुळे सोलापुरात काँग्रेसजनांएवढेच राष्ट्रवादी वासियांमध्ये उत्साहाचे भरते होत़े
काँग्रेस, राष्ट्रवादीचे लवकरच विलीनीकरण
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज भिन्न असले तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष लवकरच एकमेकात मिसळतील, त्यांचे विलीनीकरण होईल, असे भाकीत काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
First published on: 18-02-2014 at 08:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp and congress both parties will become one sushilkumar shinde