Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीतील पक्षांसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची तिसरी यादी (NCP Ajit Pawar Third Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

anna bansode sunil shelke
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळातून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Jyoti Mete
Jyoti Mete : ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; विधानसभा लढवणार?
Baba Siddiqui murder, Baba Siddiqui NC,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
ajit pawar
उमेदवारांच्या पोकळीमुळे ‘पलीकडे’ इच्छुकांना निमंत्रण – अजित पवार
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
BJP state president MLA Chandrasekhar Bawankule appeal to Uddhav Thackeray regarding election
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

हेही वाचा : Priti Band : उद्धव ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत बडनेरात ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष निवडणूक लढणार

कोणत्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली? वाचा यादी!

क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
गेवराईविजयसिंह पंडित
पारनेरकाशिनाथ दाते
फलटणसचिन पाटील
निफाडदिलीप बनकर

पारनेरमध्ये काशिनाथ दाते विरुद्ध राणी लंके सामना रंगणार

पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पारनेरसाठी काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पारनेरमध्ये आता काशिनाथ दाते विरुद्ध राणी लंके असा सामना रंगणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या याआदी दोन याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार, आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून दिलीप वळसे पाटील, येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, मावळमधून सुनील शेळके, अहिल्यानगर शहर (अहमदनगर) संग्राम जगताप, परळीमधून धनंजय मुंडे यांच्यासह आदी नेत्यांच्या नावाचा सहभाग होता.