Sharad Pawar on EVM: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फारसे सार्वजनिक मंचावर न दिसलेले शरद पवार आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. “निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले”, असे सांगून शरद पवारांनी विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कमी मतदान असूनही शिंदे-अजित पवारांचे अधिक आमदार

शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

हे वाचा >> Uttamrao Jankar: मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आमदारकी सोडणार, शपथविधीच्या दिवशीच उत्तमराव जानकरांची मोठी घोषणा

मोठ्या राज्यात भाजपाचा विजय

शरद पवार म्हणाले, “आकडेवारीतून काही गोष्ट दिसत असल्या तरी आमच्याकडे अधिकृत अशी काही माहिती नाही. त्यामुळे मी आज तरी ईव्हीएमवर शंका घेत नाही. हे फक्त मतांचे आकडे असून ते आश्चर्यकारक आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. तिथे सत्ताधारी आमच्यावर टीका करत होते. ‘लोकसभेला ईव्हीएमची तक्रार नव्हती, आताच ईव्हीएमविरोधात तक्रार का करता?’ असा युक्तीवाद सत्ताधारी करत असल्याचे मी ऐकले. पण मागच्या दोन महिन्यात चार निवडणुका झाल्या. त्यावरून सांगतो, हरियाणामध्ये भाजपाची अवस्था अतिशय वाईट होती, पण तिथे त्यांचा विजय झाला. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही, तिथे नॅशनल कॉन्फरन्सला यश मिळाले. महाराष्ट्रात भाजपाचा विजय झाला आणि आमचा पराभव झाला. पण त्याचवेळेला झारखंडमध्ये त्यांचा पराभव झाला.”

या चारही राज्याच्या निकालावरून सत्ताधारी हे म्हणू शकतात की, दोन निवडणुकीत एका ठिकाणी तुम्ही जिंकलात आणि दुसरीकडे आम्ही जिंकलो. त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्यातून असे दिसते की, मोठ्या राज्यात भाजपाचा विजय झाला आहे, तर छोटी राज्ये विरोधकांकडे गेली आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis on EVM: ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधूंच्या निकालाकडे दाखविले बोट; म्हणाले, “लातूरमध्ये…”

म्हणून मी मारकडवाडीत जातोय

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील लोक मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ग्रामस्थ इच्छुक आहेत. पण प्रशासनाने त्यास विरोध दर्शविला. “प्रचारावेळी निवडणुकीची सभा बघूनच कोणता उमेदवार जिंकणार हे कळते. कोल्हापूरमध्येही आमच्या उमेदवारांच्या सभा जोरदार झाल्या. पण त्यांचा पराभव झाला. राज्यात मुख्य निवडणूक प्रक्रिया होऊन गेली आहे. त्यामुळे एखाद्या गावाने जर त्यांच्या पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावर बंदी कशासाठी आणि कोणत्या कायद्याद्वारे? १४४ सारखे कलम लावण्याची गरजच काय? त्यामुळे गावातल्या लोकांचे नेमके म्हणणे काय आहे, यासाठी मी मारकडवाडीत जाणार आहे”, असे शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.