राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. पण, शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार दिला आहे. अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

“मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. तेव्हा काँग्रेस अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

हेही वाचा : VIDEO : “देवेंद्र फडणवीसांना सत्ता पाडायची माहिती होती, मुख्यमंत्री कोण होणार, हे…”, नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

“तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

हेही वाचा : “धुळे आणि नंदूरबारला राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, अन् म्हणे…”, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“लोकसभा निवडणुकीच्या ११ महिन्यानंतर कोणत्या खासदाराला लगेच निवडणूक परवडणार होती? अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यावर खासदार आणि पक्ष निवडून येईल का? याबाबत साशंकता होती. सीताराम केसरी यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला. कारण, केसरी यांना वाटलं होतं, ते स्वत: पंतप्रधान होतील,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.

Story img Loader