निवडणुका जवळ आल्या कपिल पाटील हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून काम करतात. त्यांनी या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. महाआघाडी होण्याआधी कपिल पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना कपिल पाटील हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छोट्या मित्रपक्षांना फक्त तीन जागा सोडणार आणि इतर छोट्या पक्षांनी काय फक्त प्रचाराची वाजंत्री वाजवायची का? असा प्रश्न कपिल पाटील यांनी विचारला होता. तसेच प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय महाआघाडी पूर्ण होऊ शकत नाही असेही कपिल पाटील यांनी त्यांच्या पत्रात म्हटले होते. या वक्तव्याचाही नवाब मलिक यांनी समाचार घेतला.

कपिल पाटील यांना जेव्हा आमदार व्हायचे असते तेव्हा आमच्याकडे येऊन ते लोटांगण घालतात. मग दिल्लीत एका नेत्याच्या मागे फिरून आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. निवडणुका जवळ आल्या की मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून काम करतात. हे धंदे त्यांनी थांबवले पाहिजेत असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पत्र लिहून मीडियाकडे दिलं म्हणजे त्यांचा हेतू नेमका काय? असाही प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरु आहे, राजू शेट्टींसोबतही चर्चा सुरु आहे. कपिल पाटील यांना काही शंका असेल तर त्यांनी शरद यादवांशी बोलावं असाही सल्ला मलिक यांनी दिला.