बीडच्या गेवराई तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करून निर्माण झालेल्या खड्ड्यात चार मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान यावरुन पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत. शाळकरी मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर याला उत्तर देत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे यांनी काय म्हटलं?

“गेवराई तालुक्यात शहानजहानपूर येथे चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. वाळू माफियांनी वाळूचं उत्खनन केलं आणि त्यानंतर खड्डे भरले नाहीत. पावसाळ्यानंतर तिथे पाणी साचलं आणि मुलांना तो खड्डा न दिसल्याने त्यात बुडून मृत्यू झाला. यातील तीन मुलं शहाजहानपूर आणि एक तांदळवाडीमधील आहे. त्यांच्या आई, वडिलांच्या दु:खात मी सहभागी आहे. आमचे आमदार लक्ष्मण पवार तिथे जाऊन लक्ष देत आहेत. मी माफियाराजवर रोज बोलत असते. असे किती लोकांचे जीव जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल केला पाहिजे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

PHOTOS: राजकीय वाद बाजूला ठेवून मुंडे भाऊ-बहीण रमले कौटुंबिक सोहळ्यात

धनंजय मुंडेंचं उत्तर –

“चार मुलांच्या मृत्यूबद्दल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना याबाबत विचारणा केली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तिथे खड्डा झाला, पाणी साचलं आणि खेळायला गेले असता मुलांचा मृत्यू झाला हे खरं आहे. तो वाळूचा खड्ड अधिकृत होता की अनधिकृत होता? अधिकृत होता तर इतक्या खोलपर्यंत करता येतो का? अनधिकृत होता तर कारवाई का झाली नाही? याची माहिती घेतली जात आहे,” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

दोषी असल्यास तहसीलदारांपासून पोलिसांपर्यंत सर्वांवर कारवाई केली जाणार आहे सांगताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या मागणीवर उत्तर दिलं की, तुमच्या काळात वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला असेल तर निश्चित करू, मात्र आता तो होत नाही. तसंच ३०२ खड्ड्यावर करायचा का? चौकशीअंती अनेक गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर कारवाई करता येईल असंही ते म्हणाले.