राजकीय नेत्यांना राजकारणाच्या मैदानात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आक्रमक होताना आपण अनेकदा पाहतो. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेदेखील नेहमीच आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत असतात. पण एका कौटुंबिक विवाहसोहळ्याच्या निमित्ताने एक वेगळे धनंजय मुंडेही लोकांना पहायला मिळाले. लातूर येथे धनंजय मुंडे यांच्या भाचीचं लग्न पार पडलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी चक्क बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

लातूरमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या भाचीचा विवाहसोहळा पार पडला. भाची तेजश्री वामनराव केंद्रेंच्या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते. हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले. दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

दरम्यान याच विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत तसंच आवाज देत उत्साह वाढवत होते.

पंकजा मुंडेंसोबत मनमोकळ्या गप्पा

तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ राजकीय वैमनस्य सोडून एकत्र आल्याचं पहायला मिळालं. राजकीय मैदानात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे भाऊ बहिण यावेळी मात्र मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसले होते.

याआधीही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेकदा काही कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप पाहता कौटुंबिक कार्यक्रमातील त्यांच्या भेटीवर सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान यावेळी बहिण भाऊ बराच वेळ गप्पा मारत होते. तसंच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र बसून जेवणदेखील केलं.

Story img Loader