राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन अखिल ब्राह्मण महासंघाकडून मंत्रघोष करण्यात येत होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी असून त्यांनी हे विधान केलं तेव्हा स्टेजवर उपस्थित असणारे धनंजय मुंडे यांनी यावर भाष्य केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली. तसंच आपण अमोल मिटकरी यांच्याशी बोललो असून त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

NCP कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघाला रुपाली ठोंबरेंनी पळवून लावलं; केळी घेऊन पोहोचल्या; म्हणाल्या “मी तर त्यांना…”

“कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. जात-पात, धर्म हे आमच्या अंगालादेखील शिवलेलं नाही. आमच्यासोबत सावलीप्रमाणे हे लोक उभे आहेत म्हणून इथपर्यंत पोहोचल्याची आम्हाला जाणीव आहे,” असं यावेळी मुंडेंनी म्हटलं.

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघ आक्रमक; माफीची मागणी होताच म्हणाले, “जे माफी मागा म्हणतायत त्यांना…”!

“आम्ही मागे हसत असल्याचं दाखवलं जात आहे. पण आम्ही त्याच कारणासाठी हसत होतो याच्यातला संदर्भ कुठेही नाही,” अशीही बाजू त्यांनी मांडली. “अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील,” असं धनंजय मुंडे सांगितलं.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते.

दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

“कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही”

“ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही”, असं मिटकरी म्हणाले आहेत.

“राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा…”

“मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचं मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे”, असं मिटकरी म्हणाले.

Story img Loader