राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे चिपळूण तालुक्यातील राजकारणाने पुन्हा एकदा नाटय़मय वळण घेतले आहे. नगर परिषदेतील सत्तेविना जगू न शकणारे कदम आता भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र पुढे येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यापूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी कदम यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शेकापच्या पाठिंब्यावर रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे त्यांना पुन्हा पक्षात पावन करून घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना दूर ठेवत पक्षश्रेष्ठींनी चिपळूण नगर परिषद निवडणुकीचे सर्वाधिकार कदमांकडे सोपवले. पण या निवडणुकीत २६ पैकी अवघ्या ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तसेच नगराध्यक्षपदही भाजपनेजिंकल्यामुळे कदम कमालीचे अस्वस्थ झाले. कारण १९७४ मध्ये प्रथम निवडून आल्यापासून नगर परिषदेच्या सत्तेची त्यांना सवय झाली आहे. त्या तुलनेत चिपळूण तालुक्यात त्यांचा फारसा प्रभाव नाही. म्हणून निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जाण्याबाबत चाचपणी केलेल्या कदमांनी या निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने खटपट सुरू केली.

तालुक्यातील पक्षाचे माजी आमदार डॉ. विनय नातूंमार्फत राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची त्या दृष्टीने चर्चा झाली असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही नवीन अडथळे निर्माण न झाल्यास येत्या काही दिवसांत कदम भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा नगर परिषदेतील सत्ता वर्तुळात वावरताना दिसू लागतील, अशी चिन्हे आहेत.

खरे तर भास्कर जाधव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेले काही महिने सुरू होती. मात्र नगर परिषद निवडणुका होईपर्यंत त्यांनी वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले. तसेच त्या निवडणुकीत आपले काही कट्टर समर्थक कार्यकर्ते शिवसेनेत पाठवून दिले. त्यामुळे त्यांनी आपला मोहरा सेनेच्या दिशेने वळवल्याचे बोलले जात आहे. पण त्यांच्याकडून अशी काही प्रत्यक्ष कृती होण्यापूर्वीच त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक असलेल्या कदमांनी हा राजीनामाा दिला.

  1. कदम यांची जिल्ह्य़ात सोडाच, पण तालुक्यातही फारशी ताकद उरलेली नाही. चिपळूण शहरात असलेल्या त्यांच्या राजकीय प्रभावाचाही फुगा फुटला आहे. पण सेनेला शक्यतो दूर ठेवण्याच्या भाजपच्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून चिपळूण नगर परिषदेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पक्षनेत्यांनी कदम यांचा पर्याय स्वीकारला असावा, असे मानले जात आहे.
  2. निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे चारही सदस्य आपल्याबरोबर असल्याचा कदम यांचा दावा आहे. तसे झाल्यास केवळ पाच सदस्य असलेल्या भाजपप्रणीत आघाडीचे बळ नऊपर्यंत जाऊ शकते. तसेच निवडून आलेले काँग्रेसचे पाच सदस्यही स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून या आघाडीला पाठिंबा देऊ शकतात, असे या डावपेचांमागील गणित आहे.
  3. कदम खरोखर भाजपमध्ये गेले तर पुढील पाच वर्षांत पन्नास वष्रे लक्षात राहील अशी कामगिरी करून दाखवण्याची घोषणा केलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांची सर्वात जास्त कोंडी होणार आहे. मागील सभागृहात त्यांनी कदमांच्या मार्गदर्शनाखाली कारभार चालवणाऱ्या राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्याचबरोबर कदमांच्या कार्यपद्धतीला कंटाळून चिपळूणच्या मतदारांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीला घरची वाट दाखवली होती. पण आता भाजपच्या वाटेने पुन्हा तेच नगर परिषदेच्या सत्तावर्तुळात वावरू लागले तर खेराडेंच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली कारभार सुरू होण्यापूर्वीच जनतेचा भ्रमनिरास होईल, हे उघड दिसत आहे.