कुणबी फॅक्टर निर्णायक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादीने दापोली पंचायत समिती सभापतीपदासाठी अनपेक्षितपणे चंद्रकांत बकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने सर्वच राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुरोंडी जिल्हा परिषद गटातील अस्थिर झालेली कुणबी ‘व्होटबँक’ ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न श्री. बकर यांच्या निवडीतून आता स्पष्ट झाला आहे. दरम्यान, पालगडचे राजेश गुजर यांची उपसभापतीपदी निवड करून पंचायत समितीत कुणबी-मराठा असे सामाजिक समीकरणही पक्षाने यशस्वीपणे साधले आहे.

मुळात दापोली पंचायत समितीचे सभापतीपद खुले असतानाही इतर मागास समाजाच्या नेत्याला या पदावर संधी देऊन राष्ट्रवादीने कुणबी फॅक्टर निर्णायक ठरवला. यामध्ये गिम्हवणे गणात सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या योगिता बांद्रे यांचे नाव अग्रस्थानी होते. पण चंद्रकांत बकर यांच्या नावावर झालेल्या निश्चितीमध्ये आमदार संजय कदम यांचे भूमिका महत्त्वाची ठरली. श्री. बकर हे बुरोंडी पंचायत समिती गणातील सदस्य असून संपूर्ण बुरोंडी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीच्या ताब्यात येण्यासाठीत्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली आहे. येथे शिवसेना विरूद्ध भाजपमध्ये झालेल्या झुंजीत राष्ट्रवादीची सरशी झाली. त्यामुळे शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेली कार्यकर्त्यांची आणि कुणबी समाजाची व्होटबँक आता अस्थिर आहे. या परिस्थितीत आमदार संजय कदम यांनी सभापतीपदी बकर यांची निवड करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दिशेने दाखवलेली मुत्सद्देगिरी आता स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, पालगडचे पंचायत समिती सदस्य आणि मराठा समाजाचे नेते राजेश उर्फ पप्पू गुजर यांची उपसभापतीपदी निवड करून पक्षाने कुणबी-मराठा असा सामाजिक ‘सुवर्णमध्य’ गाठण्यातही यश मिळवले आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीत १२ पकी सात सदस्यसंख्या असूनही राष्ट्रवादीने आजपर्यंत सभापती पद निश्चिती प्रक्रिया गुलदस्त्यात ठेवली होती. त्यामुळे या सभापती पदासाठी पक्षाचे सदस्य पप्पू गुजर, योगिता बांद्रे, रऊफ हजवाने यांची नावे राजकीय वर्तुळात चच्रेला पुढे येत होती. पण आमदार संजय कदम आणि तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत चच्रेत नसलेले चंद्रकांत बकर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.

शिवसेनकडून सभापतीपदासाठी जालगावचे पंचायत समिती सदस्य मनोज भांबीड, तर उपसभापतीपदासाठी असेंडच्या पंचायत समिती सदस्या वृषाली सुर्वे यांनी अर्ज भरला होता. आज मतदानाच्यावेळी सात विरूद्ध पाच अशा फरकाने चंद्रकांत बकर आणि पप्पू गुजर यांनी विरोधकांवर मात केली आणि दापोली पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा पहिला सभापती आणि उपसभापती म्हणून बसण्याचा मान मिळवला.