लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आव्हान स्वीकारत उस्मानाबादेत त्यांच्याविरुद्ध प्रचारासाठी येण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. न्या. पी. बी. सावंत आयोगाच्या अहवालातील मुद्यांसह अनेक बाबींचा उल्लेख असलेले मतदार जागृती अभियान हे पत्रक मतदारसंघात वाटणार असल्याचे सांगत येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पवन राजेिनबाळकर हत्या प्रकरणातील पारसमल जैन याचा जबाब, हजारे यांच्या खुनाची सुपारी देण्याचा प्रयत्न, तेरणा साखर कारखान्यातील गरप्रकार, निधीचा दुरूपयोग, सावंत आयोगाचा चौकशी अहवाल, मंत्रिपदी असताना पदाचा गरवापर, ठिबक संच खरेदी घोटाळा आदी मुद्यांकडे पत्रकात लक्ष वेधले असून, डॉ. पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा अथवा विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. तेथे सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले निष्कलंक उमेदवार निवडून देणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे न चुकता मतदान करा, असे आवाहन करीत मतदारांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड करावी व एकही उमेदवार पसंत नसेल तर नापसंतीचे बटन दाबून आपल्या मताचा अधिकार वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हजारे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिंडीत
लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आव्हान स्वीकारत उस्मानाबादेत त्यांच्याविरुद्ध प्रचारासाठी येण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे.
First published on: 08-04-2014 at 01:40 IST
TOPICSअण्णा हजारेAnna Hazareउस्मानाबादOsmanabadनिवडणूक २०२४Electionपद्मसिंह पाटीलPadamsinh Patilराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp in gap due to anna hazare enact