लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आव्हान स्वीकारत उस्मानाबादेत त्यांच्याविरुद्ध प्रचारासाठी येण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. न्या. पी. बी. सावंत आयोगाच्या अहवालातील मुद्यांसह अनेक बाबींचा उल्लेख असलेले मतदार जागृती अभियान हे पत्रक मतदारसंघात वाटणार असल्याचे सांगत येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पवन राजेिनबाळकर हत्या प्रकरणातील पारसमल जैन याचा जबाब, हजारे यांच्या खुनाची सुपारी देण्याचा प्रयत्न, तेरणा साखर कारखान्यातील गरप्रकार, निधीचा दुरूपयोग, सावंत आयोगाचा चौकशी अहवाल, मंत्रिपदी असताना पदाचा गरवापर, ठिबक संच खरेदी घोटाळा आदी मुद्यांकडे पत्रकात लक्ष वेधले असून, डॉ. पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा अथवा विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. तेथे सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले निष्कलंक उमेदवार निवडून देणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे न चुकता मतदान करा, असे आवाहन करीत मतदारांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड करावी व एकही उमेदवार पसंत नसेल तर नापसंतीचे बटन दाबून आपल्या मताचा अधिकार वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा