महाविकास आघाडी कायम राहणार की नाही? याविषयी सतत चर्चा सुरु असतात. अनेकदा भाजपाकडून हे सांगितलं जातं की महाविकास आघाडीमध्ये एकोपा राहिलेला नाही. तसंच महाविकास आघाडी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लढली तर त्यांचं जागावाटप कसं होणार? असाही प्रश्न विचारला जातो. या सगळ्या चर्चा सुरु असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं सूचक वक्तव्य केलं आहे. अजून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तरीही कोल्हापूरमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत अजित पवार?

“आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

भाजपावर अजित पवार यांची कडाडून टीका

कर्नाटक निवडणुकीत भाजपाला वाटलं होतं की आम्हीच जिंकू. मात्र तसं घडलं नाही. लोकांनी मतदान करुन काँग्रेसला निवडलं. भाजपाला वाटलंही नव्हतं की काँग्रेसच्या इतक्या जागा येतील. बजरंग दलावर बंदीची मागणी झाल्यानंतर बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा करण्यात आला. आजवर तुम्ही कधी ऐकलं होतं का? की बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे? लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न कर्नाटकमध्ये झाला. मात्र कर्नाटकमध्ये जनतेने दाखवून दिलं की ते काय करु शकतात. असंही अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे गटावरही टीका

उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी जो पक्ष स्थापन केला तो पक्षच या लोकांनी घेतला. निवडणूक आयोगाने यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. मात्र जनतेला ते पटलं आहे का? आज यांना पाहिलं की गद्दार हा शब्द जनतेला आठवतो तसंच ५० खोके हा शब्दही आठवतो असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

Story img Loader