Monsoon Session of Maharashtra Assembly Updates: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडून दोन आठवडे उलटले आहेत. २ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इथर ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. खुद्द अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर अजित पवार गटासाठी खातेवाटप, शिंदे गट व भाजपाच्या मंत्र्यांची गेलेली खाती, अजित पवारांना मिळालेलं अर्थखातं अशा अनेक मुद्द्यांवर राजकारण रंगलं. या पार्श्वभूमीवर १७ जुलै अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच त्याचा प्रत्यय आला!

नेमकं झालं काय?

विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर उभं राहात नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी पहिलंच नाव अजित पवार यांचं घेतल्यामुळे त्यावर विरोधी बाकांवरून काहीतरी प्रतिक्रिया येणार असा अंदाज होता. झालंही तसंच!

CM Eknath Shinde claims that there is no dissatisfaction in allocation of seats in mahayuti
महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Atishi AAP leader takes oath as Chief Minister of Delhi
Atishi : “मैं आतिशी..”, मुख्यमंत्रिपदी आतिशी विराजमान! दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री!
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?
Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Aap Leader Atishi Said About CM Post
Atishi : ‘दिल्लीच्या मुख्यमंत्री तुम्ही होणार का?’, विचारताच आतिशी म्हणाल्या, “मी…”
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : “दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार”, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं.

“त्यांची-आमची जुनी ओळख!”

यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असं जयंत पाटील म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली!

अजित पवारांनंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचाही परिचय सभागृहाला करून दिला. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी घेतली.