शिवसेना फुटल्यानंतर बाहेर पडलेल्यांना पश्चाताप होत असून ते पुनर्विचार करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लवकरच वेगळं चित्र असेल असंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत,” असेही जयंत पाटील म्हणाले.

‘अर्थाचा अनर्थ’ झाला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली सांभाळण्यात व्यग्र; जयंत पाटील संतापले

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोला जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil on maharashtra governement ekanth shinde shivsena sgy