मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

“मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी,” अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध

पुण्यात पावसाचा धुमाकूळ ; ११ किलोमीटर उंचीचे ढग; अकरा वर्षांतील विक्रमी पाऊस

“सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे त्यातून घोषणा केली, मात्र पैशांची जुळणी झालेली नाही. जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही . जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल,” असंही जयंत पाटील म्हणाले.

“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही, पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती त्यात पुणे महानगरपालिका कमी पडली,” असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. “पुणे महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीपात्रातून जाणारा पाण्याचा वेग या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा मागच्या पाच वर्षात करता आली असती परंतु ती केली नसल्याने पुण्यातील जनतेवर संकट ओढावले,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

“पाऊस पडण्याचे नियंत्रण पालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहिती आहे, पण पुणे शहरावर संकट आले, गाडया वाहून गेल्या. जर नालेसफाई व इतर गोष्टींकडे लक्ष दिले असते, स्मार्ट सिटी कार्यक्रम राबवला त्यातून कामे केली असती तर चांगलं चित्र दिसलं असतं,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“पुणे महानगरपालिकेत मागील पाच वर्षात ‘अर्थाचा अनर्थ’ झाला किंवा काहीच कामं झालं नाहीत. उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळयाने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाले म्हणून हे संकट आले,” असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पुणे महानगरपालिकेत आलेल्या संकटाची ‘शास्त्रीय चौकशी’ करणे आवश्यक आहे अशी मागणी करतानाच असा पाऊस आला की, पूर येतो. मात्र आपण हा विषय चर्चा करुन सोडून देतो. पण पुणे हे देशातील मुंबईनंतर दहाव्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे अशा गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या शहरात असे होणे कमीपणाचे आहे. नागरी असुविधा होत असतील तर लक्ष देण्याची आवश्यकता आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader