Jitendra Awhad Post On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपाच्या १९ मंत्री, शिवसेना (शिंदे) ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाला ९ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अनेक दिग्गजांना बाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही डावलण्यात आले आहे. यानंतर विरोधकांकडून ओबीसी नेतृत्वाला बाहेर ठेवल्याचा आरोप भाजपावर होत आहे. यादरम्यान छगन भुजबळ यांनीदेखील उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यादरम्यान शरद पवार यांनी भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाडांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.

आव्हाडांनी त्यांच्या पोस्टमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आज छगन भुजबळांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवारांबरोबर छगन भुजबळ आले; त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी (शरद पवार) त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ! छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय शरद पवार स्वतः उभे रहायचे”.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Chhagan Bhujbal on leadership
Chhagan Bhujbal : “देवेंद्र फडणवीसही सुरुवातीला नाराज होते, पण…” मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाबाब छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
Twitter influencer Gajabhau posted video
Gajabhau vs Mohit Kamboj: ‘गजाभाऊ अखेर समोर आला’, मोहित कंबोज यांना शॅडो गृहमंत्री म्हणत भाजपावर केली टीका
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar : “उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विश्वासघात केला नसता तर आज…”, भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान

छगन भुजबळांच्या भूतकाळाबद्दल आव्हाडांनी माहिती दिली आहे. “१९८५ -९० च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळासाहेबांनंतर कुणीही केले नसेल”.

“मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतेय की, आदरणीय शरद पवारसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही”, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

छगन भुजबळ काय म्हणाले?

मंत्रिपद न मिळाल्याच्या चर्चेदरम्यान छगन भुजबळांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. अनेकवेळा अशी मंत्रि‍पदे आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणूनदेखील काम केलेलं आहे. शिवसेनेचा एकटा आमदार असतानाही मी सर्वांना तोंड देण्याचं काम केलं. प्रश्न हा मंत्रि‍पदाचा नाही. ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं. त्यामुळे मी दु:खी आहे. मंत्रि‍पदे येतात आणि जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना शरद पवार यांच्याबरोबरही मी होतो. तसेच अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबरही मी होतो”, असं छगन भुजबळ म्हणालेत.

हेही वाचा>> Chhagan Bhujbal : “मला जी वागणूक दिली, अपमानित केलं, म्हणून मी…”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं विधान

आता पुढची भूमिका काय? याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेशी आणि अनेक कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते मी ठरवणार आहे. मात्र, एक आहे की जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं.

Story img Loader