राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र ईडी-सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपा इतर पक्षांवर दबाव आणत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज धुळवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे या कारवायांवर निशाणा साधला आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं अटक केली असून ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कारभार इतर चार मंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच, मुंबई अध्यक्षपद मलिकांकडून काढून न घेता राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

“ईडीच्या बैलाचा ढोल..”

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. आव्हाड बोलत असताना त्यांचे कार्यकर्ते “ईडीच्या बैलाचा ढोल..” अशा घोषणा देत होते.

“…याला देवही माफ करत नाही”

“कुणाचंतरी आयुष्य बेरंग करणं, याला देवही माफ करत नाही. प्रत्येकाचं आयुष्य सप्तरंगी असतं. ते आयुष्य बेरंग करून टाकायचं त्याच्या मुला-बाळांचं आयुष्य बेरंग करून टाकायचं. त्याच्या आयुष्यात काजळी यावी असं काहीतरी करायचं. ठीक आहे. काही दिवसांसाठी हे बरं वाटेल. आतमध्ये (तुरुंगात) गेलेला माणूस कदाचित खंगून खंगून मरेल सुद्धा. पण हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील”, असं आव्हाड म्हणाले. हा निशाणा अप्रत्यक्षपणे ईडी-सीबीआय आणि भाजपावर असल्याचं बोललं जात आहे.

“शिवीगाळ, वाट्टेल ते बोलणं हे माझ्या स्वभावात”

दरम्यान, यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या स्वभावाविषयी मिश्किल टिप्पणी केली. “माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की माझी दररोजच होळी असते. मी जे बोलतो, ते माझे कार्यकर्ते कधीच मनाला लावून घेत नाहीत. कारण त्यांना माहितीये की हा रागाच्या भरात काहीही बोलतो. आणि मी हे असं आज नाही, तर गेली ३०-३५ वर्ष बोलतोय. त्यामुळे शिवीगाळ करणं, वाट्टेल ते बोलणं हे माझ्या स्वभावात आहे. फक्त टीव्हीवर नाही बोलता येत”, असं आव्हाड म्हणाले.