अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी २ जुलै रोजी वेगळी वाट धरल्यापासून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकतंच या सर्वांना खातेवाटपही जाहीर झालं. मात्र, अद्याप अजित पवारांबरोबर गेलेले आमदार कोणते व त्यांचा आकडा नेमका किती? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, खुद्द अजित पवार गटानं यासंदर्भात फक्त ‘बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने’ असा दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आता पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने चित्र स्पष्ट होणार आहे.

कुणाला कुणाचा व्हीप लागू होणार?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी व विरोधकांमद्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व निरनिराळ्या दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून पक्षातील आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता कोणते आमदार कुठे बसणार आणि कुणाला कुणाचा व्हीप लागू होणार? हा वाद पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
desalination, Piyush Goyal , sea water , mumbai ,
समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार, पीयूष गोयल यांच्या घोषणेमुळे राजकीय पेच दूर
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
climate turmeric impact loksatta
हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लागवड किती घटली, उत्पादनात किती घट येणार

राष्ट्रवादीच्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस

जवळपास वर्षभरापूर्वी शिवसेनेतील फुटीनंतरही असाच वाद महाराष्ट्रानं अनुभवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तोच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने अजित पवारांसह शपथ घेतलेल्या एकूण ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे साहजिकच हे ९ आमदार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर ४४ आमदारांना उद्देशून जितेंद्र आव्हाडांनी हा व्हीप जारी केला आहे. आता त्यातले किती विरोधी बाकांवर बसणार आणि किती सत्ताधारी बाकांवर जाणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Monsoon Session 2023 : विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून…

दरम्यान, अद्याप विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेतल्यामुळे, तसेच राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणता? यासंदर्भात पक्षफुटीनंतर संभ्रम निर्माण झाल्यामुळे कुणाचा व्हीप कोणत्या आमदारांना लागू असेल? याबाबत पुरेशी स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एका नव्या गुंतागुंतीच्या प्रकरणाची ही सुरुवात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Story img Loader