NCP Spilt Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसह सरकारला पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय.

या भूकंपानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

Live Updates

Maharashtra Political Crisis Ahit Pawat Live: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!

20:12 (IST) 2 Jul 2023
नव्या सत्ता समीकरणामुळे सोलापुरात राष्ट्रवादीसह शिंदे गटात चलबिचलता; मोहिते-पाटील गटही अस्वस्थ ?

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार समर्थकांनी जल्लोष केला. तर नवे सत्ता समीकरण शिवसेनेला रुचलेले दिसत नसल्याचे संकेत मिळत आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गोटातही अस्वस्थता पसरल्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा सविस्तर...

19:32 (IST) 2 Jul 2023
राज्यातील विधानसभा व लोकसभेची एकत्र निवडणूक?

लोकसभेची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय मुद्द्यांच्या आधारे लढवेल. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक झाली तर त्याचा लाभ भाजपला मिळू शकतो.

वाचा सविस्तर...

19:26 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar News: जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला!

संख्या बरीच आमच्याबरोबर आली आहे. आता राज्य तुमच्या मनाप्रमाणे नसून आमच्या मनाप्रमाणे चालेल, असं भाजपा एकनाथ शिंदेंना सांगायला लागेल. मधल्या काळात एकनाथ शिंदे प्रचंड जोरात चालले होते. ते कुणाचं फारसं ऐकून घेत नव्हते. ठाण्यात तर ते कुणाचीच अपॉइंटमेंट मान्य करत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा प्रचंड राग काही लोकांना असावा, त्यामुळे त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी हे केलं असावं. शिवसेनेतून तिकडे जाताना अनेक आमदारांनी सांगितलं की तेव्हाचे अर्थमंत्री अजित पवारांमुळे आणि राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय झाला, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत. आता जर राष्ट्रवादीचे हे सगळे तिकडे जात असतील, तर एकनाथ शिंदेंना माघारी फिरण्याची एक संधी आहे - जयंत पाटील

19:21 (IST) 2 Jul 2023
Video: अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत; राज्यात नेमकं घडतंय काय? पाहा गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे नेमकं काय घडणार? यावर चर्चेला उधाण आलं आहे.

पाहा व्हिडीओ

19:14 (IST) 2 Jul 2023
अजित पवारांमुळे त्रिपक्षीय सरकारचे भाजपचे स्वप्न अखेर साकार

काँग्रेसला एकटे पाडण्यासाठी त्रिपक्षीय सरकारची मोदी यांची खेळी २०१८ मध्ये यशस्वी झाली नव्हती. अजित पवार यांच्या निर्णयामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे त्रिपक्षीय सरकारचे भाजपचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे.

हेही वाचा...

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive">

19:09 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar News: ५ जुलै रोजी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

५ जुलै रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची वाय बी चव्हाण सेंटरला बैठक असेल - जयंत पाटील

19:01 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना टोला

"जे बोलले, त्याच्या बरोबर उलट केलं", काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ट्वीट केला 'तो' व्हिडीओ!

https://twitter.com/NitinRaut_INC/status/1675444283737001984

18:58 (IST) 2 Jul 2023
जितेंद्र आव्हाडांच्या निष्ठा थोरल्या पवारांपाशी

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात रविवारी झालेल्या बंडापासून चार हात लांब रहात जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा आपल्या निष्ठा थोरल्या पवारांच्या चरणी वाहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर...

18:54 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया

प्रेरणा... - सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया!

https://twitter.com/supriya_sule/status/1675494231950118913

18:52 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: अजित पवारांच्या शपथविधीवर राशीद अलवींची खोचक प्रतिक्रिया

हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा विनोद - राशीद अलवी

https://twitter.com/PTI_News/status/1675466735628038146

18:49 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: अजितदादा चक्की पिसिंग - काँग्रेसचं सूचक ट्वीट

काँग्रेसनं केला फडणवीसांचा 'तो' व्हिडीओ शेअर!

https://twitter.com/srinivasiyc/status/1675465103897165824

18:46 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: लढणं, जिंकणं महाराष्ट्राच्या रक्तातच - रोहित पवारांचं ट्वीट

वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच... - रोहित पवार

https://twitter.com/RRPSpeaks/status/1675492503771054080

18:37 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: शरद पवारांनी ट्विटरवर मांडली सविस्तर भूमिका!

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल. पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत. आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1675485284044271616

18:35 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: बाळासाहेब थोरातांची राष्ट्रवादीतील फुटीवर प्रतिक्रिया...

२०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

18:33 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: आदित्य ठाकरेंचं सूचक ट्वीट!

आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न - मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी? एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना... एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!

https://twitter.com/AUThackeray/status/1675487297192751104

18:26 (IST) 2 Jul 2023
दिल्लीतील बैठकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब

दिल्लीत जूनमध्ये झालेल्या चार बैठकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला खतपाणी घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर...

<a href="https://www.facebook.com/search/top?q=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AC">

18:23 (IST) 2 Jul 2023
भाजपबरोबर गेलेले चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

भाजपबरोबर गेलेले प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. भाजपबरोबर जाण्यात हे महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते.

वाचा सविस्तर...

18:00 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही - शरद पवार

शरद पवारांच्या माध्यमातून मला पक्षानं जे काही दिलंय, त्यासाठी मी आभारी आहे. आज जे काही झालंय, तो पक्षाचा निर्णय समजून अजित पवारांनी घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी शरद पवारांच्या विधानावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही - प्रफुल्ल पटेल

17:55 (IST) 2 Jul 2023
छगन भुजबळ यांचे आणखी एक बंड

अजित पवार यांना साथ देत राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. खुद्द भुजबळांनी बंडखोरी केल्याची कुणालाही पुसटशीही पूर्वकल्पना नव्हती. भुजबळांचे हे दुसरे बंड आहे.

वाचा सविस्तर...

17:55 (IST) 2 Jul 2023
देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत रवानगी?

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा फेरविस्तार केला जाणार असल्याने फडणवीस यांनाही केंद्रीय मंत्रीपद दिले जाऊ शकते.

वाचा सविस्तर...

17:45 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: मी शरद पवारांबरोबरच - आमदार सुनील भुसारा

आज काही शपथविधी झाले. टीव्हीवर सगळं बघायला मिळालं. धक्का बसला. अजित पवारांना मी नेहमीच या भूमिकेपासून परावृत्त करत होतो. मी पक्षाबरोब आहे, शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी पक्षाबरोबर आहे - सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

17:40 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: एकनाथ शिंदेंचं ट्वीट, म्हणाले...

शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं ट्वीट, म्हणाले, "आता डबल इंजिनचं सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल"

https://twitter.com/mieknathshinde/status/1675459041827618816

17:38 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: अजून पवारांनी फोनाफोनी सुरू केलेली नाही, जरा थांबा - जितेंद्र आव्हाड

अजून शरद पवार पूर्णपणे अॅक्टिव्ह झालेले नाहीत. टेलिफोन ऑपरेटरनी फोनाफोनी करायला सुरुवात केलेली नाहीये. जरा थांबा - जितेंद्र आव्हाड

17:37 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: माझा व्हीप त्यांना लागू होणार - जितेंद्र आव्हाड

आव्हाड म्हणतात, जयंत पाटलांनी माझी प्रतोद म्हणून निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद म्हणून मी जो व्हीप जारी करेन, तो सगळ्यांना लागू असेल - जितेंद्र आव्हाड

17:34 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News:

अजित पवारांनी सांगितलं प्रदेशाध्यक्षबदला. दुसऱ्या दिवशी तर बदलता येत नाही ना. जो माणूस तिथे आहे, त्यालाही विचारात घ्यावं लागतं ना, चर्चा करूनच एकत्रित निर्णय होतो - जितेंद्र आव्हाड

17:34 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News:

एखाद्या मुलानं म्हाताऱ्या बापाला घराबाहेर काढावं, त्या बापाला काय वाटत असेल याची आपल्याला कल्पना आहे. तुमच्या तोंडावर दु:खाची छटाही दिसत नाही म्हणजे काय? ६ तारखेला बैठक होतीच ना? त्याच्याआधीच एवढी घाई? ६ तारखेला बैठक ठेवा असं सांगून त्यानंतर ही गोष्ट करणं, याला काय म्हणायचं? - जितेंद्र आव्हाड

17:33 (IST) 2 Jul 2023
“मी काही ज्योतिषी नाही…”, शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांसह सरकारमध्ये आज सामील झाले. त्यांचा शपथविधीही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

सविस्तर वाचा

17:33 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News:

कित्येकांच्या बायका, मुलं, नातेवाईक फोन करत आहेत की आम्ही त्यांना समजावून सांगतो. गावात उद्रेक व्हायला लागला आहे. सगळं काही आरामात सुरू नाहीये. ज्या माणसानं एकहाती तुम्हाला मोकळं मैदान दिलं, त्याला तुम्ही शेवटी काय दिलं? तुम्हाला मंत्रीपद दिलं, तुम्ही चार आमदार तरी निवडून आणले का? त्यांनीच सगळे आमदार निवडून आणायचे, पावसात सभा घ्यायच्या आणि तुम्हाला मंत्रालयात बसायला पाठवायचं? - जितेंद्र आव्हाड

17:31 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News: मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही - जितेंद्र आव्हाड

मला कुणीही विचारलं नाही, मी माझं भाग्य समजतो की मला कुणी याबद्दल विचारलं नाही. मी मेलो, तरी शरद पवारांना सोडणार नाही - जितेंद्र आव्हाड

17:30 (IST) 2 Jul 2023
NCP Spilt Ajit Pawar Live News:

२५ वर्षं तुम्ही पदं उपभोगली आहेत. आणखी शरद पवार तुम्हाला काय देणार? काय त्यांचं घर काढून देणार का? ज्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही महसूलमंत्री, तुम्ही अर्थमंत्री वगैरे.. अशा माणसाला त्याच्या या वयात, त्याच्या अखेरच्या काळात ज्या बापानं आपल्याला सर्व समृद्धी, मानसन्मान दिले, त्याला अशा स्थितीत आणणं हे माणुसकीला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

Maharashtra New Deputy Chief Minister Ajit Pawar

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!