NCP Spilt Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसह सरकारला पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय.
या भूकंपानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.
Maharashtra Political Crisis Ahit Pawat Live: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
जयंत पाटलांनी माझी प्रतोद म्हणून निवड केली आहे. त्यामुळे मी जे व्हीप काढेन, ते त्या सगळ्यांना लागू होतील – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच नेते आहेत. त्यांचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे – जितेंद्र आव्हाड
पक्षचिन्हाचं माझ्यापुरतं सांगतो, मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली, तेव्हा चिन्ह होतं दोन बैल.. त्यानंतर दुसरी निवडणूक मी चरख्यावर लढवली. त्याआधीची निवडणूक गाय-वासरू चिन्हावर लढलो. नंतर घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढलो. त्यामुळे चिन्ह वगैरे काही नसतं. लोक बघतात समोरचा माणूस कोण आहे, त्याचं काम काय आहे. तेवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर माझा आहे. माझ्या १४ निवडणुका झाल्या आहेत. त्या निवडणुकीत लोकांनी मला निवडून दिलं, त्याअर्थी त्यांचा माझ्यावर विश्वास असावा. भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात आश्वासक चेहरा शरद पवार – शरद पवार
मी साहेबांबरोबर… – जयंत पाटलांनी ट्वीट करून केलं स्पष्ट!
मी साहेबांबरोबर… pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023
पुढच्या निवडणुकीपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाची अपेक्षा मला नाही – शरद पवार
साहेबाच्याही काही गंमती आहेत. अशा स्थितीत साहेबाला भयंकर हुरूप येतो. अजून जोरात फिरायचं असतं. अजून लोकांमध्ये जाऊन उभं राहायला आनंद होतो. नवं नेतृत्व तयार करायला आनंद होतो. मी बोलणं योग्य नाही, पण जे कुणी मंत्री झाले, त्यांची बारकाईने माहिती घ्या. बहुसंख्य लोकांची सुरुवात कुणी कशी केली हे जर तुम्ही बघितलं तर मला चिंता करण्याची गरज नाही. मी नव्या कर्तृत्वाची पिढी उभी करू शकतो – शरद पवार
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना मी जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांनी पक्षाध्यक्षाच्या मार्गदर्शक सूचना मोडून चुकीचं पाऊल उचललं तर ते योग्य नाही. या पदावर राहाण्याचा त्यांना अधिकार नाही. ही बाब त्यांनी स्वत: समजून पदावरून बाजूला व्हायचं की नाही याचा निर्णय घ्यायला हवा – शरद पवार
दुसरी टीम आमच्याकडे शिल्लक कोण आहे ते तर बघू द्या. ज्यांना जायचंय, ते थांबणार नाहीत. जे जाणार नाहीत, ते थांबलेत. त्यामुळे दुसरी-तिसरी टीम हा विषयच नाही. पुढच्या निवडणुका होतील, तेव्हा आमच्या पक्षाची नवीन टीम तुम्हाला दिसेल – राज ठाकरेंच्या ट्विटर पोस्टवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया…
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
मोदींची धोरणं पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? निवडणुकीला ४ वर्षं झाली. त्याआधी निवडणुकीच आमचं लक्ष्य मोदी होते. मोदींचं लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षं काम केल्यानंतर आज अचानक असं काय परिवर्तन झालं? असं काहीही नाही. त्यांना तिकडे जायचं होतं. त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी जी वक्तव्य केली, आरोप केले.. त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळं घडत असावं – शरद पवार
एकनाथ शिंदे आणि भाजपावाल्यांनी त्यांच्या उपयोगितेचा विचार करावा. शपथविधीचा कार्यक्रम मी पाहिला. त्यात आत्ता मंत्रीपदावर जे आहेत, जे होऊ इच्छितात त्यांचे चेहरे मला चिंताजनक दिसत होते – शरद पवार
आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही. जे गेले त्यांच्यातलेच काही लोक संपर्क साधतायत. त्यांना दोन गोष्टींची चिंता आहे. एक तर मतदारसंघ आणि दुसरं पक्षांतर्गत कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी असलेले व्यक्तिगत संबंध. सत्तेचा काही लाभ त्यांना होईल. चारदोन कामं होतील. निवडणुकीसाठीच्या सहाय्याबाबत हे चिंतामुक्त झाले असतील. पण या सगळ्या गोष्टी १०० टक्के यश देतात असं नव्हे. शेवटी लोक ठरवतात. लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. ती चिंता यातल्या अनेकांना असावी, म्हणून ते आमच्याशी संपर्क साधत आहेत – शरद पवार
या सगळ्यांवर केलेल्या कारवायांमधून त्यांना कधी क्लीनचिट मिळतेय आणि या सगळ्यातलं नेमकं काय अंडरस्टँडिंग होतं, हे लोकांसमोर येईल याची मी वाट बघतोय – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांसह सरकारमध्ये आज सामील झाले. त्यांचा शपथविधीही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. त्याग पवार यांनी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेऊन बंड केल्याचे संकेत दिले.
गेले याची चिता नाही. मला चिंता फक्त त्यांच्या पुढच्या भवितव्याची आहे – शरद पवार
हा प्रश्न घराचा नाहीये. जनतेसमोर एखादी भूमिका आपण मांडतो, ते चालूच राहणार. आम्ही पक्ष त्या मार्गाने पुढे वाढवणार – शरद पवार
तिथे गेलेल्या काही लोकांनी मला फोन केला आणि आम्हाला इथे बोलवून आमच्या सह्या घेतल्या. पण आमची भूमिका वेगळी आहे असं ते म्हणाले. दोन-तीन दिवसांत भेटून भूमिका सांगू, असं ते म्हणाले. पण या ९ जणांपैकी भुजबळ माझ्याशी बोलून गेले की जे होतंय ते योग्य नाही. ते म्हणाले मी तिथे जातो आणि काय आहे ते तुम्हाला कळवतो. आता त्यांनी शपथ घेतल्याचं कळवलं – शरद पवार
ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, त्या प्रत्येकाबाबत निर्णय घ्यावा लागेल. सर्व ९ लोकांबाबत निर्णय घेतला जाईल – शरद पवार
पक्षाच्या धोरणाशी विसंदत भूमिका कुणी घेतली असेल, तर ती योग्य नाही. त्यासाठी पक्षातले प्रमुख लोक बसती आणि त्याबाबतचा निर्णय घेतील. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि इतरांशी मला बोलावं लागेल. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. उदाहरणार्थ, सरचिटणीस म्हणून तटकरेंची नेमणूक मी केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची मी नेमणूक केली आहे. माझं त्यांना म्हणणं आहे की पक्षाच्या हितासाठी जी पावलं त्यांनी टाकायला हवी होती, ती टाकली नाहीत. आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कार्यवाही करावी नाहीतर मला कारवाई करावी लागेल – शरद पवार
आम्हाला निवडून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला असणार. ज्यांच्याशी संघर्षाची भूमिका घेतली, आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर ते अस्वस्थ होणार. त्यात त्यांचा दोष नाही. पण ती अस्वस्थता काढायची असेल, तर पुन्हा संघटनेची बांधणी करण्याचं काम करावं लागेल. ते काम माझ्याबरोबर महाराष्ट्रातले असंख्य तरुण करतील याची मला खात्री आहे – शरद पवार
विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, यावर आत्ताच मी काही सांगू शकत नाही. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना आहे. पण पक्षप्रमुख म्हणून पुढच्या काही दिवसांत आम्ही आढावा घेऊ. काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा पक्ष किंवा आमचा पक्षही असू शकतो. आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ – शरद पवार
पक्षाचं नाव घेऊन कुणी भूमिका घेत असेल तर त्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकांकडे आमची भूमिका मांडू – शरद पवार
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता ही माहिती मला तुमच्याकडून मिळाली. राजीनामा द्यायचा असेल तर ते द्यायचं ठिकाणी विधानसभा अध्यक्ष हे आहे. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक अध्यक्ष करतात. त्यांच्याकडे राजीनामा दिला असेल, तर ते आम्हाला कळण्याचं काही कारण नाही – शरद पवार
कुणी काहीही दावा करावा, माझं काहीही म्हणणं नाही. माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांकडे जाईन. यावर लोक निर्णय घेतील. राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता. आमचे काही मतभेद काँग्रेसशी झाले आणि पक्ष नसताना आम्ही पक्ष स्थापन केला. पहिला पक्ष इतरांनी नेला असेल, पण त्याचा परिणाम आमच्यावर झाला नाही. त्यामुळे कुणी काहीही दावा केला, तरी आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडू. माझी खात्री आहे की आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल – शरद पवार
देशाच्या कानाकोपऱ्यातून मला आज फोन येत आहेत. या सगळ्या स्थितीत आपण सगळे एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे असं ते सांगत आहेत. इथे येण्याआधी ममता बॅनर्जींचा मला फोन आला. मल्लिकार्जुन खर्गेंचा फोन आला. इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशात पर्यायी शक्ती उभी करावी असं धोरण ठेवणाऱ्यांची ही भूमिका आहे. जे घडलं, त्याची मला चिंता नाहीये. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे आणि कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजाच्या घटकांचा पहिला मेळावा घेणार आहे. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल आणि जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल हा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल – शरद पवार
हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो, त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. महिन्याभरानंतर त्यापैकी ६ सोडले तर सगळे माझा पक्ष सोडून गेले. मी त्या ५८ आमदारांचा पक्षनेता होतो, त्याऐवजी मी पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन पुन्हा पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत २ गोष्टी झाल्या. आमची संख्या ६९ वर गेली. संख्या नुसतीच वाढली नाही, तर पक्ष सोडून गेलेल्यांपैकी ३ ते ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० चं चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर पुन्हा कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम असेल. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर तरुणांवर विश्वास आहे – शरद पवार
आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका. ६ तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक धोरण करण्याबाबतचे, त्याचा विचार होणार होता. पण त्याआधीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षाच्या विधिमंडळाच्या सदस्यांनी किती वेगळी भूमिका घेतली, याचं नेमकं चित्र दोन दिवसांत लोकांसमोर येईल. कारण ज्यांची नावं आली, त्यायतल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. पण मी यावर आत्ताच काही बोलू इच्छित नाही – शरद पवार
दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. ते काँग्रेसविरोधी होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला आहे'. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याबरोबर जलसिंचनातील घोटाळ्याची जी तक्रार होती, त्याचा उल्लेख त्यांनी केला. मला आनंद आहे की आज मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ, त्याबाबतचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्या्ंनी मुक्त केलं. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे – शरद पवार
महाविकास आघाडी आता फुटायची राहिलीये का? जे देशाची मोट बांधायला निघाले, आता त्यांचीच बोट फुटली आहे. सगळे एकत्र येतात, पण पतप्रधानपदाचा उमेदवार कोण? हे ठरत नाहीये. त्यामुळे आज महाविकास आघाडीची बोट फुटली, अजित पवार त्या बोटीतून विकासाच्या बोटीत आले आहेत. आज कुणाचा क्लीन बोल्ड झालाय हे सगळ्या राज्यानं आणि देशानं पाहिलंय – एकनाथ शिंदे
मोदींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार सुरू होतं. त्याला विकासाचा दृष्टीकोन ठेवणाऱ्या अजित पवारांनी साथ दिली, सरकारसोबत ते सामील झाले. मी त्यांचं आणि त्यांच्या आमदारांचं स्वागत करतो – एकनाथ शिंदे
नाद करा, पण आमचा कुठं? – देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करून भाजपा नेत्याचं खोचक ट्वीट!
नाद करा, पण आमचा कुठं? pic.twitter.com/8YvaOrA6AY
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 2, 2023
Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!