NCP Spilt Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसह सरकारला पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय.
या भूकंपानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.
Maharashtra Political Crisis Ahit Pawat Live: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
काँग्रेसची वेट अँड वॉच भूमिका आहे. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टी दाखवून लोकांच्या विचारांशी खेळणं आणि लोकांवर अन्याय करणं हा ऑपरेशन लोटस आहे. आता पुढे काय होतंय त्याकडे काँग्रेसचं लक्ष आहे. जयंत पाटलांशी माझं बोलणं झालंय. शरद पवार आता बोलतील, त्यानंतर आता कळेल – नाना पटोले
अजित पवारांना पक्षातील ४० विधानसभा आणि ६ विधान परिषद आमदारांचा पाठिंबा – सूत्रांची माहिती
Deputy Chief Minister Ajit Pawar has backing of 40 NCP MLAs & 6 NCP MLCs: Sources pic.twitter.com/rV0HciEWcE
— ANI (@ANI) July 2, 2023
राष्ट्रवादीतील आमदार शरद पवारांवर नाराज होते? पाटण्यातील बैठकीत सहभागी झाल्यावरून राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एएनआयनं दिली आहे.
Some MLAs accompanying NCP leader Ajit Pawar to Raj Bhawan were “upset” with Sharad Pawar’s “unilateral” decision to share stage and ally with Rahul Gandhi at the opposition unity meet in Patna: Sources pic.twitter.com/YGc7eKd95V
— ANI (@ANI) July 2, 2023
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचं ट्वीट…
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो. pic.twitter.com/mvZ2oh7w6u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2023
अजित पवारांनी राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर नुकतीच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झालेले प्रफुल्ल पटेल हेही अजित पवारांबरोबर दिसल्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री
विधानसभा, लोकसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवणार – अजित पवार
Newly appointed Maharashtra Deputy CM Ajit Pawar, says "Today, we have decided to support the Maharashtra government and took oath as ministers. There will be a discussion on the portfolios later. Considering all aspects at the national level, we thought that we should support… pic.twitter.com/GxVoo2RWQQ
— ANI (@ANI) July 2, 2023
राष्ट्रवादी पक्षातील सर्व सदस्य आमच्याबरोबर – अजित पवार
आमच्याकडे सर्व आकडे आहेत. सगळे आमदार आमच्याबरोबर आहेत. आपल्याला काही मटक्याचा आकडा काढायचा नाहीये. पक्ष आमच्याबरोबर आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलंय. वरिष्ठांनाही सांगितलंय. लोकशाहीत बहुमताला महत्त्व दिलं जातं. मागे काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला येऊन नवा पक्ष उभा राहिला. त्यानंतर वेळोवेळी पक्षानं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. हे २४ वर्षांत तुम्ही बघितलं आहे. २४ वर्षांत पाणी बरंच वाहून गेलं आहे. आता नवीन नेतृत्वही पुढे आलं पाहिजे. विरोधी पक्षात काम करत असताना आम्ही बारकाईनं समस्या पाहिल्या आहेत. आता मंत्रीमंडळ बैठकीत आम्ही ते मुद्दे समोर आणू. सरकारच्या माध्यमातून ते विषय हाताळण्याचं काम करू – अजित पवार
१९८४ सालानंतर कोणताही एक नेता देशाला पुढे घेऊन जातोय असं कधी झालं नाही. पण गेल्या ९ वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली देश आज काम करतोय. ते विदेशातही लोकप्रिय आहेत.
अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says "Now we have 1 Chief Minister and 2 Deputy Chief Ministers. The double-engine government has now become triple engine. For the development of Maharashtra, I welcome Ajit Pawar and his leaders. Ajit Pawar's experience will help strengthen… pic.twitter.com/B5ZFBDX7Yb
— ANI (@ANI) July 2, 2023
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला सांगितलं की २०२४मध्ये देशात मोदी सरकारच येणार नाही. असं असेल, तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे, सरकारची मदत घेतली पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे शासनात जाऊन लोकांची कामं करण्याला आमचं प्राधान्य असेल – छगन भुजबळ
आम्ही महाआघाडीचा तिसरा घटक म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सहभागी झालो आहे. इतक्या दिवसांपासून चर्चा चालू होती. राज्यातले प्रश्न सोडवायचे असतील, तर सकारात्मक काम करणं गरजेचं आहे हे ओळखून आम्ही हा निर्णय घेतला. मोदींवर अनेकदा आम्ही टीका केली, पण आज ते मजबूतपणे देशाचं नेतृत्व करतायत हे नाकारता येत नाही – छगन भुजबळ
आम्ही जर शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, तर आम्ही भाजपाबरोबरही जाऊ शकतो. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही इथेही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो – अजित पवार
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं, केंद्राचा अधिकाधिक निधी महाराष्ट्रासाठी आणणं आणि सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. बहुतेक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पुढच्या सर्व निवडणुका पक्षाच्या नाव व चिन्हाखाली लढवणार आहोत. त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत – अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक राज्याच वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधकांच्या बैठकीतून आऊटपुट निघत नाही. भारतात खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही तसा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीसांचं सरकार काम करत होतं. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. वर्धापन दिनी मी माझी भूमिका स्पष्ट केली होती – अजित पवार
आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे बहुसंख्य आमदार सहभागी झालो आहोत. त्यानुसार मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली – अजित पवार
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडखोरीनंतर आता संजय राऊतांनी सूचक विधान केलं असून महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच, हे होणारच होतं, असं सूचक ट्वीटही त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!