भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

आता चंद्रकांत पाटलांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असं विधान अजित पवारांनी केलं. ते बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. महापुरुषांवर आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या इतर नेत्यांवरही अजित पवारांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे.

Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

हेही वाचा- VIDEO: “डोक्यात शेण भरलंय त्यांच्या अन् भोग मात्र…”, अमोल कोल्हेंची सध्याच्या राजकारणावरील मार्मिक कविता

चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. पण चंद्रकांत पाटील म्हणतात, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या. हे तुला कुणी सांगितलं? आम्ही तुला भिकारड्यासारखा बोलतो, असं म्हटलं तर कसं वाटेल? पण आम्ही असं म्हणणार नाही. पण कदाचित तुम्हाला असं कुणी म्हटलंच तर काय होईल? याचा विचार करायला हवा.”

हेही वाचा- “अरे गोपीचंदा, तुला काही कळतं की नाही बाबा”, पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची तुफान टोलेबाजी!

“इतरांना बोलता येत नाही का? आम्हालाही आरे ला कारे करता येतं. ‘भ’ची भाषा तर आम्हाला खूप चांगली जमते. पण आम्हाला तसं बोलायचं नाही. तसं वागायचं नाही. कारण तशी आमची संस्कृती नाही. आम्हाला वडिलधाऱ्यांनी तसे संस्कार दिले नाहीत,” असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई

अजित पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “सावित्राबाई फुले आणि महत्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली नसती, तर बहुजन समाजातील मुलं-मुली कुठे गेले असते. मूठभर लोकांच्या हातात शिक्षणाच्या सर्व संधी एकवटल्या असत्या. शिक्षणाची कवाडं उघडण्याचं काम या महापुरषांनी केली, अशा महापुरुषांना तुम्ही भीक मागून शाळा सुरू केल्या म्हणत आहात? आता यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन उद्याच्या निवडणुकीत कोण भिकेला लागतंय? हे चंद्रकांत पाटलांना दाखवण्याची वेळ आली आहे” अशा शब्दांत अजित पवारांनी टीकास्र सोडलं आहे.