अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. नाशिक येथे केलेल्या भाषणातून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतो. जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढत आहे. भविष्यात एक महासत्ता म्हणून भारताची आगेकूच सुरू आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं.

अजित पवार भाषणात म्हणाले, “मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने नाशिककरांना आणि माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, कसल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं, तर महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठिशी उभं राहील. तुम्ही अजिबात एकटं वाटून घेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व मिळालं आहे. उद्या काही मदत लागली तर आम्ही लोक पंतप्रधान मोदींना भेटून तशी मदत निश्चितपणे मिळवू शकतो.”

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत
Pune-Nashik railway , old route, Mahayuti,
पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गावरून हवी, विरोधकांसह महायुतीच्या लोकप्रतिनिधींचीही मागणी
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Sludge, dam, silt , nashik district, campaign,
नाशिक : फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहीम
CM Devendra Fadnavis hold meeting on Kumbh Mela preparations
नाशिकजवळ ‘महाकुंभ’ची निर्मिती करा मुख्यमंत्री; संमेलन केंद्र उभारण्याच्याही अधिकाऱ्यांना सूचना

हेही वाचा- “अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी”, महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपली

“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतोय. जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढण्याचं काम होतं आहे. केंद्रसरकारच्या माध्यमातून देशात सर्वत्र विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या राज्याच्या विकासाला आणखी गती देण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा- “भाज्यांच्या दरवाढीला मुस्लीम जबाबदार”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

अजित पवारांनी पुढे नमूद केलं की, “कालच देशाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण केलं आहे. ही चांद्रयान मोहीम भारतीय आंतराळ संशोधन संस्थेची एक गरुडभरारी आहे. उद्याच्या काळात एक महासत्ता म्हणून भारताची आगेकूच चालली आहे. कुठल्याही क्षेत्रात भारत पाठीमागे राहणार नाही, याची खबरदारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतली आहे. ही चांद्रयानची मोहीम यशस्वी व्हावी, म्हणून मी इस्त्रोचे वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाचंही कौतुक करतो. आज संपूर्ण जगाने या गोष्टीची नोंद घेतली आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.”

Story img Loader