राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पडळकरांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपाच्या भूमिकेवर टीका केली आहे. गोटे यांनी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातही एक खुलासा केला आहे. फडणवीस यांचे टरबुज्या हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेतेच असल्याचा दावा गोटे यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपामधील नेत्यांचे बारसे अन्य कुणाला करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. “एकमेकांमधील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसं साजरं केलं. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे. आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झालं आहे. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय?,” असा टोला गोटे यांनी आपल्या पत्रकामधून लगावला आहे. पुढे बोलताना गोटे यांनी भाजपामध्ये नावं छोटी करुन वापरण्याची पद्धतच असल्याचे म्हटले आहे. “भाजपामध्ये स्वता:च नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पद्धत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अणित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत,” असा टोला गोटे यांनी लगावला आहे.
आधी वाट पाहिली मग सारवासारव केली
अनिल गोटे यांनी पडळकरांच्या वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. “गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा व देशातील सर्वोच्च नेत्यांच्या क्षेणीतील नेते शरद पवार यांना अवमानास्पद व हीन दर्जाची उपमा देऊन पातळी सद्यस्थितीतील महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची राजकारणीत देशभरात लक्षात आली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवरांना ‘करोना’ती उपमा दिल्यानंतर खरे तर, भाजपाच्या नेत्यांनी तातडीने खुलास करणे आवश्यक होते. प्रारंभीचे २४ तास भाजपाच्या एकाही नेत्याने कुठळीही प्रतिक्रिया दिली नाही. राज्यात नेमकी काय प्रतिक्रीया उमटते याची वाटत पाहत बसले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे स्वत: पडळकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरु पाहत होते. परंतु जनमानसातील तीव्र संतापाच्या झळा भाजपा नेत्यांपर्यंत पोहचू लागताच भाजपाने सारवा सारव सुरु केली,” असं गोटे यांनी पत्रकात म्हटलं आहे.
भाजपाचा महाराष्ट्रातील छुपा अजेंडा
भाजपाचा महाराष्ट्रातील छुपा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोपही गोटे यांनी या पत्रकामधून केला आहे. “आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी ‘पडळकर हे स्वत: स्पष्टीकरण देतील’ असे सांगितले गेल्या चार दिवसांत अजून तरी पडळकरांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. उलट पडकळरांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. कशाचे लक्षण समजायचे? फटाक्यांच्या माळा लावून त्यांचे स्वागत करीत आहेत. आरत्या ओवाळल्या जात आहेत. करोनामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला. दुधाचे भाव पडले दूध स्वस्त झाले. दुधाच्या पडलेल्या भावाचा गैरफायदा घेऊन भाजपाचे कार्यकर्ते पडळकरांच्या फोटोला दुर्गाभिषेक करीत आहेत. आमच्या धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरुन शरद पवरांनी जातीचा उल्लेख करुन धनगर समाजाला समस्त मराठा समाजाविरुद्ध भडकविण्याचे उद्योग बेमालुमपणे सुरु आहे. भाजपाचा महाराष्ट्रातील छुपा अजेंडा राबविण्याचे काम शाखा शाखामधून कुजबूज आंदोलनाद्वारे सुरु आहे,” असं गोटे यांनी म्हटलं आहे.
पोटात होत तेच ओठात आले
पडळकरांच्या पोटात होते तेच ओठात आल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून आल्याचा टोलाही गोटे यांनी लगावला आहे. “नरेंद्र मोदी व अमित शाह जोडीने करोनाचा आधार घेऊन हिंदू मुस्लिम समाज धर्मात असलेली धार्मित तेढ व संघर्षाचा फायदा उठवत आपल्या हिंदू मतांच्या गाठोड्याची बांधा बांध सुरु केली आहे. तर राज्यातील भाजपा नेते पडळकरांच्या नथीतून मराठा समाजावर तीर मारुन धनगरांचा उचकवीत आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना ‘भावनेच्या भरात मी बोलून गेलो’ असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा ‘पोटात होत तेच ओठात आले’ असा अर्थ होतो,” असं गोटेंनी पत्रात नमूद केलं आहे.