Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून नावारुपाला आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून आगामी विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे ११३ आमदार पाडू, असे आव्हान दिले होते. जरांगे पाटील यांचे टीकाकार आणि ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या छगन भुजबळ यांना याबद्दल नुकताच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना प्रतिआव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत, तसेच माझ्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवावी, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

छगन भुजबळ हे टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. मनोज जरांगेंच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना २५ वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिलेले आहे. पण माहीत नसल्यामुळे जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढे येणार आहेत. पण माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एकच काहीतरी करावे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Delhi minority areas delhi assembly election
‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?
Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल
What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : “पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं; आम्हाला..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

हे वाचा >> Devendra Fadnavis : “आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत?”, सूरतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात उभा रहा

मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान केले होते. या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, मला पाडण्यापेक्षा जरागेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवयच आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरागें पाटील यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

Story img Loader