Chhagan Bhujbal : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या निवडणुकीत प्रमुख सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. यातच या निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. यातच आज भाऊबीजेच्या निमित्ताने अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊ बहीण एकत्र येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, आता भाऊबीजेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र भेटण्याची शक्यता नाही.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “आपण सर्वांनी अपेक्षा करूयात की सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज संध्याकाळपर्यंत एकत्रित येतील भाऊबीज साजरी करतील. यावेळी एकत्रित भाऊबीज साजरी नाही केली तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्रित आलं पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार

छगन भुजबळ काय म्हणाले?

“बारामतीत यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पण आपण सर्वांनी एक अपेक्षा करूयात की, आज रात्रीपर्यंत त्यांनी एकत्र यावे. भाऊबीज साजरी करावी. समजा आता एकत्र नाही आले तर किमान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला एकत्र आलं पाहिजे. आता राजकीय विचार त्यांचे वेगळे असू शकतात. जसं शरद पवारांनी सांगितलं की, मी कुटुंब फूटू देणार नाही. त्यामुळे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला

“आपण शब्द कुठले वापरावेत? याचा विचार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे. विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय म्हणतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे. जे तुमच्याबरोबर २५ ते ३० वर्ष राहिले आहेत. त्या सर्वांना ते लागू होतं. मला वाटतं की त्यांनी एवढ्यावर समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात शरद पवारांचा हात आहे. तसं त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात माझाही हात आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शब्द सांभाळून वापरले पाहिजेत”, असा सल्ला छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

Story img Loader