उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. “दोन लोक एकमेकांशी भांडतात, गोळीबार करतात, त्यांचे वैयक्तिक भांडण असते, त्यात देवेंद्र फडणवीस काय करू शकतात?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

“आता अमित शहा यांनाच…”, भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा संताप

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
ajit pawar sharad pawar sadabhau khot
“त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”, अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
Devendra Fadnavis will contest from Nagpur South West assembly constituency print politics news
लक्षवेधी लढत: देवेंद्र फडणवीस यंदाही गड राखणार !

आंतरवाली सराटीसारखं होऊ नये

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले, “मी काल टीव्हीवर ही बातमी पाहिली, तेव्हाच मला आश्चर्य वाटलं. हे कशामुळं झालं, त्यांच्यामध्ये एवढा संताप का होता? याची माहिती समोर आलेली नाही. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मी आताच या प्रकरणावर अधिक काही बोलणार नाही, कारण सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. नाहीतर आंतरवाली सराटी सारखे होईल. आंतरवाली सराटीमध्ये असेच झाले होते. आधी तिथे दगडफेक झाली, ८० जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण सर्वांसमोर पहिला भाग आलाच नाही, दुसरा भागच आला. त्यामुळे उल्हासनगरच्या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे पाहावं लागेल. प्रत्यक्षदर्शी लोक याबाबत अधिक माहिती देऊ शकतील.”

सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंवरच टीका केली. “फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. फडणवीस यांनी गोळीबार करण्यासाठी सांगितलेले नाही. उल्हासनगर प्रकरणात दोन लोकांचे वैयक्तिक भांडण होते, असे दिसत आहे. वैयक्तिक भांडणातून असे गुन्हे घडत असतात. मलाही एक आमदार किती शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, मारायची-कापायची भाषा वापरतो. त्याला फडणवीस काय करणार? फडणवीस एवढेच करू शकतात की, काही झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू शकतात”, अशी उपरोधिक टीका छगन भुजबळ यांनी केली.

“एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, त्यांच्यामुळेच मी गोळीबार…”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

दरम्यान उल्हासनगर गोळीबारावर बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. “मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेमागे काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?”, असा उद्विग्न सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

नेमकी घटना काय घडली?

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला.

महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात बोलाचाली झाली.यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली.