राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत मंगळवारी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ‘लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही’, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. या टीकेवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

भाजपाचे कधीकाळी दोन खासदार होते हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला दहा जागाही मिळणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. जनतेने ठरवले महाआघाडीचे नेत्तृत्व शरद पवार करण्याचे, आता याच जनतेने भाजपाचे सरकार घालवायचे ठरवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.