विधानसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगलं असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत, यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
eknath shinde look extreme tiredness during maharashtra cm oath taking ceremony
थकलेल्या देहबोलीला सावरण्याचे आव्हान; झगमगाटातही शिंदेंच्या अस्वस्थतेची चर्चा
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Chhagan Bhujbal On Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदेंच्या नाराजीवर छगन भुजबळांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्रीपद गेलं आणि…”

हेही वाचा- “कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!

नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडले जावेत या विधेयकावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा, असा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला आहे, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडेंनी केली.

हेही वाचा- “आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!

आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडेदेखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले असल्याचंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Story img Loader