आमदार शहाजी बापू पाटील यांची वक्तव्यं राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय ठरत असतात. त्यांनी अनेकदा भाषणात त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती सांगितली आहे. “आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते” या त्यांच्या वक्तव्यावरुन बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. “आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, असा खोचक टोला खडसे यांनी पाटलांना लगावला आहे. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यानंतर सुधारली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर मी राजाराम पाटलाची औलाद नाही”, शहाजीबापू पाटील यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान

“त्यांनी हे कोणत्या हेतूनं म्हटलं मला माहित नाही. हे विधान त्यांनी कदाचित गंमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आता त्यांना पैशांसाठी कुणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता भासल्याचे दिसत नाही”, असे खडसे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याकडे शरद पवारांनी लक्ष दिलं नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं आहे.

मनसेबरोबर युती करणार? शहाजी बापू पाटील म्हणाले, “तिन्ही पक्षाची…”

काय म्हणाले होते शहाजी बापू पाटील?

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” हा डायलॉग प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. “खूप गरीबीत राहत आहे. किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही”, असं वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा महाविकासआघाडीकडून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. शहाजी बापू पाटलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीकडून साडीदेखील पाठवण्यात आली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader eknath khadase commented on shinde group mla shahaji bapu patils wife saree remark rvs