राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत असल्याचे खडसे म्हणाले आहेत.

ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह परत कधी मिळणार? आगामी महानगरपालिका निवडणुकाही नव्या चिन्हावरच?

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

“शिवसेनेची सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंनी काय केलं? यावरुन दोष देण्यात काहीही अर्थ नाही. पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात. काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्हीही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये” असे खडसे यांनी म्हटले आहे.

‘धनुष्यबाण’ गोठवण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याच्या आरोपांवरुन शिंदे गटाला सवाल; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या संघर्षावर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वजण आशेने पाहत आहे. मात्र, न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली. त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठा संपूर्ण महाराष्ट्रात मिळाली, असे खडसे यांनी म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना या निवडणुकीत शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

Story img Loader