केंद्रातील मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील कर ४० टक्के केल्याने देशात कांद्याचे दर पडले. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना भेटणार असल्याचं म्हटलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी बुधवारी (२३ ऑगस्ट) धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.

एकनाथ खडसे म्हणाले, “कांद्याचा प्रश्न दरवर्षी चर्चेला येतो. कधी कांदा दर कमी झाला अशी चर्चा असते, तर कधी कांदा दर जास्त झाला अशी चर्चा असते. मात्र, कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार रुपये हमीभाव दिला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता ग्राहकांनाही परवडेल आणि शेतकरी उत्पादकांनाही परवडेल असा मध्यम मार्ग काढावा लागेल.”

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

“सरकारने शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे”

“शेतकऱ्यांनी ग्राहकांना कमी दरात कांदा द्यायचा असेल, तर सरकारने शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे. म्हणजे ग्राहकांनाही कमी दरात कांदा मिळेल आणि शेतकऱ्यांनाही अनुदानाच्या माध्यमातून योग्य दर मिळेल. निव्वळ शेतकऱ्याचं नुकसान करायचं हे योग्य होणार नाही. ग्राहकांचंही नुकसान होता कामा नये आणि शेतकऱ्यालाही खड्ड्यात घालता कामा नये,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं.

“सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू”

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. कांद्यावर किती कुरघोडीचं राजकारण करावं. कृषीमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ते म्हणतात की, ते केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना भेटणार आहे. माध्यमांनी धनंजय मुंडे भेटीसाठी रवाना झाले अशी बातमी दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत. तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस भाजपाचे आहेत.”

हेही वाचा : “कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, शेतकऱ्याला…”, शिंदे गटाचा मोदी सरकारला घरचा आहेर

“फडणवीसांनी जपानमधून घोषणा केली”

“अशावेळी कृषीमंत्री घोषणा करू शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून घोषणा केली. म्हणजे या दोघांपेक्षा वरचढ देवेंद्र फडणवीसच आहेत. कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांना काय किंमत राहिली. एकनाथ शिंदेंना इथं कोण विचारतं. उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यावर मुख्यमंत्र्यांना ऐकावंच लागेल. बिचाऱ्या एकनाथ शिंदेंचा नाईलाज आहे,” अशी टीका खडसेंनी केली.