राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगावमधील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन धमकीचे फोन आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

जीवे मारण्याची धमकी देणारे फोन चार ते पाचवेळा आले असून या फोनपैकी एक फोन अमेरिकेमधून आल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…”

छोटा शकीलचे नाव सांगत आम्ही तुम्हाला मारु, अशी धमकी फोनवरुन देण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच फोन आल्याचे क्रमांक ट्रेस केले असता त्यातील एक फोन अमेरिकेवरुन आल्याचे दिसते असे सांगत या धमकीमागे राजकीय संबंध नसल्याचे आपल्याला वाटते. तसेच पोलिस तपासातून यातील तथ्य बाहेर येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे स्वगृही परतणार

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया देत आपण लवकरच पुन्हा भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीदेखील घेतल्या होत्या.